Raj Thackeray

सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न, पण..’; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सरकारला खडे बोल

94 0

बदलापूरमध्ये चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर सफाई कर्मचाऱ्याने शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य माणसासह, राजकीय नेते आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडूनही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर स्पष्ट शब्दात टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी “एक्स” या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

‘बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा… या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.

आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे’, या शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

त्याबरोबर बदलापुरात जो काही प्रकार घडला, याचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले ? कायद्याचं राज्य म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात पोलिसांकडून असा हलकाशीपणा का केला गेला ? असे प्रश्न उपस्थित करत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले.

Share This News

Related Post

… म्हणून राज ठाकरे यांनी केलं योगी आदित्यनाथ यांचं कौतुक

Posted by - April 28, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना  अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता थेट उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांचे कौतुक करत आभारही मानले…
Bajrang Sonawane Accident

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Posted by - June 5, 2024 0
बीड : नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane Accident)…

ठाण्यात भाजपची विजयी हॅट्रीक; निरंजन डावखरे विजयी

Posted by - July 1, 2024 0
विधानपरिषदेसाठी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत. डावखरे यांनी काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा…

महत्वाची बातमी ! शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे ट्विट करून शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार…
Jayant Patil

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. श्री. जयंतराव पाटील (Jayant Patil) यांच्यातर्फे व पक्षातर्फे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *