मुंबई: सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मागील महिन्यात त्यांनी आपणाला राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती.