GOPICHAND PADALKAR & JITENDRA AWHAD:
पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
VIDEO NEWS: JITENDRA AWHAD, GOPICHAND PADALKAR VIDHANSABHA: पडळकर, आव्हाड कार्यकर्ते भिडले
दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे,
मला मारण्यासाठी विधानभवनात गुंड आले होते,
मात्र मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे,
विधानभवनात काय सुरू आहे? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं,
जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले.
लॉबीमध्येच हाणामारी देखील झाली.
त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
यादरम्यानदुपारच्या सुमारास गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ होते.
यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली, धक्काबुक्की झाली.
प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास पाच ते दहा मिनिटं हा वाद सुरु होता.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळही केली.
Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी