विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत असताना निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या अनेक मंत्र्यांसह बडे नेते स्वतःलाच मतदान करू शकणार नाहीत. उमेदवारी एका मतदारसंघात तर मतदान दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती असल्यानं राज्यातील तब्बल 32 उमेदवार स्वतःला करण्याला मुकणार आहेत. देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे हे देखील स्वतःला मतदान करू शकणार नाहीत.
फडणवीस, ठाकरे स्वतःला मतदान करण्यास मुकले!
नाव उमेदवारीचे स्थळ मतदानाचे स्थळ
देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम
विकास ठाकरे नागपूर पश्चिम नागपूर दक्षिण पश्चिम
बाळासाहेब थोरात संगमनेर शिर्डी
आदित्य ठाकरे वरळी वांद्रे पूर्व
सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर चंद्रपूर
विजयकुमार गावित नंदुरबार नवापूर
आदिती तटकरे श्रीवर्धन पेण
मिलिंद देवरा वरळी मलबार हिल
रोहित पवार कर्जत जामखेड बारामती
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर कलिना
हीना गावित अक्कलकुवा नंदुरबार
ययाती नाईक कारंज पुसद
निलेश राणे कुडाळ कणकवली
धीरज देखमुख लातूर ग्रामीण लातूर शहर
झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व औरंगाबाद मध्य
संतोष बांगर कळमनुरी हिंगोली
जितेंद्र मोघे आर्णी दिग्रस
अभिजित अडसूळ दर्यापूर कांदिवली
मीनल खतगावकर लोहा देगलूर
आशिष देखमुख सावनेर नागपूर पश्चिम
विजय अग्रवाल अकोला पश्चिम अकोला पूर्व
सतीश चव्हाण गंगापूर औरंगाबाद (पश्चिम)
गोपीचंद पडळकर जत खानापूर
अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण हातकणंगले
केदार दिघे कोपरी पाचपाखाडी ओवळा माजिवडा
वैभव नाईक कुडाळ कणकवली
विनोद शेलार मालाड पश्चिम कांदिवली पूर्व
शायना एनसी मुंबादेवी मलबार हिल
अशोक उईके राळेगाव यवतमाळ
विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य
सुभाष देशमुख सोलापूर दक्षिण सोलापूर शहर मध्य