उदय सामंत हल्लाप्रकरणी सहा शिवसैनिकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

309 0

पुणे: शिंदे गटातील आमदार आमदार आणि माजी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुण्यातील न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी सुनावली आहे.

आज याप्रकरणात सुनावणी करण्यात असता त्यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी राजेश पळसकर, संभाजी थोरवे, संजय मोरे, सूरज लोखंडे, चंदन साळुंखे, बबनराव थोरात यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या आधी त्यांना या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली होती. पोलिसांनी ताब्यात घेऊन पुणे सत्र न्यायालयाने 2 दिवसांची कोठ़डी देण्यात आली होती.

त्यानंतर  त्यांची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

पोलिसांनी त्यांना पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र त्यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर याप्रकरणात विशाल धनवडे, गजानन थरकुडे यांना अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर कऱण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!