देशाच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली असून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालं आहे दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2004 ते 2014 या दहा वर्षाच्या काळात मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवलं असून 1932 मध्ये मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता अर्थमंत्री म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी त्यांनी दिली 1990 च्या मंदीतून देशाला बाहेर काढण्यात मनमोहन सिंग यांचा सिंहाचा वाटा होता.
फुफुसाच्या आजाराने मनमोहन सिंग यांचं निधन झालं.
काँग्रेसची बेळगाव मधील बैठक रद्द
मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळताच काँग्रेसची बेळगाव मध्ये सुरू असणारे दोन दिवसीय नवस सत्याग्रह बैठक रद्द करण्यात आले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगाव मधून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.