SURESH KALMADI PASSED AWAY: पुण्याच्या राजकारणातील ‘सबसे बडा खिलाडी’ हरपला! माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन

609 0

पुण्याच्या राजकारणात ‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेले पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं निधन झालं असून वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

1 मे 1944 रोजी जन्मलेले सुरेश कलमाडी यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिकलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1964 ते 1972 या काळात भारतीय वायू दलात पायलट म्हणून काम केलं. 1974 ला वायुदलातून निवृत्त घेतली अन 1977 ला इंडियन युथ काँग्रेसचे ते पुण्यातील अध्यक्ष झाले.

पुढच्याच वर्षी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यत ते युथ काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून कधी पाहिलेच नाही.

पण कॉमनवेल्थ स्पर्धेतला घोटाळा 2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता. कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर केला जात आहे. हे प्रकरण प्रचंड गाजले, या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. 26 एप्रिल 2011 ला त्यांना इतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास दहा महिने कारावासात होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.

काहीच दिवसांपूर्वी कलमाडी यांना सर्व आरोपांतून क्लीनचिट देण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव कलमाडी सध्या सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांनी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुण्यातील गणेशोत्सव ल एक नवा सांस्कृतिक आयाम दिला होता.

Share This News
error: Content is protected !!