आधी हकालपट्टी नंतर मलमपट्टी ! माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिवसेनेतच

396 0

शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली आणि या बातमीनं शिवसैनिकांसह आढळराव समर्थकांना हा मोठा धक्का बसला पण काही तासांत उपनेते शिवाजीराव आढळराव यांची हकालपट्टी करण्यात आली नसून ते शिवसेनेतच आहेत, अशी माहिती सेनेकडून जाहीर करण्यात आली.

मागील अनेक दिवसांपासून शिवाजी आढळराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीररीत्या बोलूनही दाखवली होती. अगदी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली होती.

https://youtu.be/We4-yeItucA

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभवाचा स्वीकारावा लागला होता. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उपनेते पद देण्यात आलं होतं.

Share This News
error: Content is protected !!