माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक; अनिल देशमुख यांना मोठी दुखापत

170 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

काटोल जलालखेडा मार्गावर बेलपाड्याजवळ अज्ञातंकडून ही दगडफेक करण्यात आली असून या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी झाले सांगता सभा आटोपून काटोल कडे परतताना अनिल देशमुख यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणूक लढवत असून आज प्रचाराच्या सांगता सभा आटोपून येत असताना अनिल देशमुख यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय नेमका हा हल्ला कुणी केला याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

Share This News
error: Content is protected !!