sharad pawar

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला मोठा दिलासा; कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढण्यास परवानगी

928 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला असून कर्नाटकात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र, आता राष्ट्रवादीनं देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास परवानगी दिल्यानं राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!