Breaking News

सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात

746 0

आजचा शुक्रवार अहमदनगरकरांसाठी घातवार ठरला असून सिन्नर-शिर्डी भीषण अपघात झाला असून या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.

पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!