पुणे-सातारा रस्त्यावर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू

513 0

सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ एसटी कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीतील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

बस उलटल्यामुळे बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. तसेच यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत.

दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!