JEJURI MORGAO ACCIDENT: जेजुरी मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू

112 0

जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 18/ 6 /225 रोजी सायंकाळी 6/45 मिनिटांनी किर्लोस्कर कंपनीच्या नजीक श्रीराम धाब्याच्या समोर जेजुरी मोरगाव रोड वरती श्रीराम धाब्याच्या समोर श्रीराम ढाब्याचे मालक वायसे हे त्यांचे ढाब्याचे साठी फ्रिज डिलिव्हरी पिकप मधून खाली उतरून घेत असताना स्विफ्ट डिझायर अचानक पाठीमागून येऊन धडक दिल्याने सदर अपघातामध्ये पुरुष सात व महिला एक मृत्युमुखी पडलेले असून 1 पुरुष 1 महिला व 2 लहान मुले जखमी आहे.

त्यामधील सात पुरुष व एक महिला यांची डेड बॉडी जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे पीएम साठी आणलेले असून त्यामधील एक पुरुष हॉस्पिटल एक महिला व 2 लहान मुले शांताई हॉस्पिटल जेजुरी हे उपचार कामी ऍडमिट करण्यात आलेले आहे

मयताची नावे खालील प्रमाणे

1 )सोमनाथ रामचंद्र वायसे राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे

2) रामू संजीवनी यादव राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे

3 अजय कुमार चव्हाण राहणार उत्तर प्रदेश

4) अजित अशोक जाधव राहणार कांजळे कांजळे तालुका भोर जिल्हा पुणे

5) किरण भारत राऊत किरण भारत राऊत राहणार पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे

6) अश्विनी संतोष एस आर राहणार सोलापूर

7) अक्षय संजय राऊत राहणार झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे

8) एक अनोळखी पुरुष असे मयत झालेले आहेत

Share This News
error: Content is protected !!