रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

587 0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांच्याविरोधात निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती.या समितीच्या सदस्यांनी घेतलेला निर्णय सोमवारी जाहीर करत तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई करत आता पक्षाशी त्यांचा संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

Share This News
error: Content is protected !!