EXIT POLL: एक्झिट पोलमुळे अपक्ष उमेदवारांचे "भाव" वाढणार; कोणते अपक्ष निवडून येणार, वाचा यादी

EXIT POLL: एक्झिट पोलमुळे अपक्ष उमेदवारांचे “भाव” वाढणार; कोणते अपक्ष निवडून येणार, वाचा यादी

78 0

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. एक्झिट पोलचे (EXIT POLL)आकडेही समोर आले आहेत. तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांपेक्षा जास्त निकालाची उत्सुकता ही अपक्ष उमेदवारांना आहे. कारण यंदा अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली आहे. तसाच अंदाज एक्झिट पोल वर देखील दाखवण्यात आला आहे.

अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. त्यामुळेच या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना आपल्या सोबत घेण्यासाठी मोठ्या पक्षांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

एक्झिट पोल नुसार युती आणि आघाडीला सत्तेत येण्यासाठी वंचित, मनसे, शेकाप, बविआ आणि तिसऱ्या आघाडीसह अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यातच बहुतांश पोलनुसार लहान पक्षांपेक्षा जास्त जागा अपक्ष जिंकू शकतात. त्यामुळेच युती आणि आघाडी कडून अपक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळेच अपक्ष आमदारांचे “भाव” चांगलेच चढणार आहेत. एक्झिट पोल म्हणजे केवळ शक्यता असली तरीही निवडून येण्याची शक्यता असलेले अपक्ष उमेदवार कोणते आहेत जाणून घेऊया.

अपक्षांची यादी 

समीर भुजबळ – नांदगाव
रवी राणा – बडनेरा
राजेश लाटकर – कोल्हापूर उत्तर
राहुल जगताप – श्रीगोंदा
राजेंद्र मुळक – रामटेक
विजय चौगुले – ऐरोली
रमेश आडसकर – माजलगाव
सुधाकर घारे – कर्जत, रायगड
भिमराव धोंडे – आष्टी पाटोदा
सत्यजीत पाटणकर – पाटण

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!