राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तरी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएम वर संशय घेण्यात आला.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर भारतीय जनता पक्षाला तब्बल 133 जागा, शिंदे यांचे शिवसेनेला 57 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षाला 16 जागा शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,यशोमती ठाकूर ,बच्चू कडू या सारख्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम वर संशय घ्यायला सुरुवात केली. राज्यभरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला. पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उमेदवारांकडून फेरमतमोजणीसाठी आता अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
कोणत्या पक्षातील कोणत्या नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केले आहेत
बाळासाहेब थोरात, संगमनेर , काँग्रेस
रमेश बागवे, पुणे कॅन्टोन्मेंट , काँग्रेस
प्राजक्त तनपुरे, राहुरी , शरद पवार गट
राणी लंके, पारनेर , शरद पवार गट
अभिषेक कळमकर, नगर शहर, शरद पवार गट
संदीप वर्पे , कोपरगाव, शरद पवार गट
सुनील भुसारा, विक्रमगड, शरद पवार गट
प्रशांत जगताप, हडपसर, शरद पवार गट
अशोक पवार, शिरूर, शरद पवार गट
सचिन दोडके, खडकवासला, शरद पवार गट
राहुल कलाटे, चिंचवड, शरद पवार गट
चरण वाघमारे, तुमसर, शरद पवार गट
राहुल मोटे, धाराशिव, शरद पवार गट
फहाद अहमद, अनुशक्ती नगर, शरद पवार गट
केदार दिघे, कोपरी पाचपाखाडी, शिवसेना ठाकरे गट
राजन विचारे, ठाणे शहर, शिवसेना ठाकरे गट
नरेश मणेरा, ओवळा माजिवडा, शिवसेना ठाकरे गट
दीपक म्हात्रे, डोंबिवली, शिवसेना ठाकरे गट
एम. के. मढवी, ऐरोली, शिवसेना ठाकरे गट
राजन साळवी, राजापूर, शिवसेना ठाकरे गट
हितेंद्र ठाकूर, वसई, बहुजन विकास आघाडी
क्षितिज ठाकूर, नालासोपारा, बहुजन विकास आघाडी
राजेश पाटील, बोईसर, बहुजन विकास आघाडी