MINISTERS LIST : बातमी फुटली! महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर ?

EKNATH SHINDE: भाजपच्या ऑफर एकनाथ शिंदेंनी धुडकावल्या; शिंदे घेणार ‘हा’ मोठा निर्णय

91 0

महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता युतीत मुख्यमंत्री (CM) पदावरून रस्सीखेच सुरू आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी बनलेल्या भाजप (BJP) ला आपलाच मुख्यमंत्री हवा आहे. त्यातही देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तर शिवसेनेला देखील एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) हेच मुख्यमंत्री हवे आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात दिलेल्या दोन्ही ऑफर त्यांनी नाकारल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदेंपुढे कोणत्या 2 ऑफर ?

मुख्यमंत्री पद भाजपला देऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यात उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं. अन्यथा राज्य ऐवजी केंद्रात मंत्री पद स्वीकारावं. या दोन ऑफर मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्हीही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याचं सूत्रांच्या माहितीतून समोर आलं आहे. तशी भूमिका त्यांनी महायुतीला स्पष्ट केली आहे. तर त्या ऐवजी एकनाथ शिंदे हे मंत्रिपद नाकारून मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

शिंदे कोणता निर्णय घेणार ?

कोणतंही मंत्रिपद नाकारून एकनाथ शिंदे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्याबरोबरच शिवसेनेतील दोन आमदारांचे नावं ते उपमुख्यमंत्रीपदासाठी महायुतीला देणार आहेत. सध्या राज्यात चाललेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही समाजातील एक एक नाव उपमुख्यमंत्री पदासाठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्रीपद नसेल तर गृहमंत्री पद द्यावं अशी ही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र भाजप गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल खातं स्वत: कडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदेंना हवं ‘हे’ मोठं पद

एकीकडे एकनाथ शिंदे हे मंत्रीपद न घेता पक्षातील इतर नेत्यांना मंत्रिपदाची संधी देतील अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना महायुतीचं संयोजक पद हवं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे‌. महायुतीच्या दृष्टीने हे पद अत्यंत महत्त्वाचं असून या पदाशिवाय युतीतील कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे या पदाची मागणी एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांमध्ये किती तथ्य आहे याविषयीचे अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!