महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

206 0

राज्यात सुरू असलेल्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली राज्यपाल भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी समारंभामध्ये हा शपथविधी समारोह संपन्न झाला.

Share This News
error: Content is protected !!