EKNATH SHINDE HEALTH UPDATE : प्रकृती खालावल्याने एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

EKNATH SHINDE HEALTH UPDATE : प्रकृती खालावल्याने एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; शिंदेंच्या मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय आढळलं ?

183 0

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. याच पार्श्वभूमीवर आज त्यांना मुंबईतील जुपिटर हॉस्पिटल (Jupiter Hospital) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना तीन दिवसांपूर्वी 105 डिग्री इतका ताप होता. तेव्हापासून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार देखील सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने आज काही चेकअप करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या रिपोर्टची (Medical report) माहिती देखील समोर आली आहे.

ताप, अशक्तपणा, घशाचा संसर्ग असल्यानं आज एकनाथ शिंदे यांना मुंबईतील जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शिंदेंची डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना अँटी बायोटिक औषधं सुरू केली आहेत. त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू आहेत.

शिंदेंच्या बैठका रद्द

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर आज बैठक पार पडणार होती. मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार होती. मात्र ही बैठक देखील आता रद्द करण्यात आली आहे. शिंदे स्वतः रुग्णालयात असल्यानं ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर महायुतीच्या ज्या बैठका पार पडणार होत्या त्याला देखील एकनाथ शिंदे अनुपस्थित राहणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!