EKNATH SHINDE : एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली! महायुतीच्या दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहणार ?

एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग; उपचारासाठी ज्युपीटर रुग्णालयात दाखल

7033 6

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मागील दोन दिवसांपासून तब्येत ठीक नसून एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या गावी असताना त्यांना 105 इतका ताप आला होता.

त्यानंतर कालही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नियोजित बैठका रद्द करून विश्रांती घेतली होती मात्र ताप आणि अशक्तपणा असल्यानं आज एकनाथ शिंदे यांना मुंबईतील जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक काळातच एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांचा डेंग्यू व मलेरियाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे

 

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!