मोठी बातमी! बांधकाम व्यावसायिक डीएसकेंवर सीबीआयकडून दोन गुन्हे दाखल

993 0

ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी  यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी स्टेट बँक, सेंट्रल बँक व अन्य काही बँकांची मिळून एकूण 590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

डीएसकेंनी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक व अन्य काही बँकांची मिळून तब्बल ५९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. डी. एस. के. यांच्या कुटुंबातील काही सदस्यही त्यांच्या कंपनीत संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन स्वतंत्र गुन्हे असून, यापैकी पहिला गुन्हा हा स्टेट बँकेने १ जुलै २०२० रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. यानुसार, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, विजया बँक यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

Share This News
error: Content is protected !!