Breaking News

मोठी बातमी! डीआरडीओच्या संचालकाला एटीएस कडून अटक

312 0

पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून  संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा संशय एटीएस ला संशय आहे.

डीआरडीओचा हा शास्त्रज्ञ पुणे येथ कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हचे हस्तक यांच्याशी सोशल मिडिया च्या माध्यमातून व्हॉट अपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्काति राहिले असल्याची माहिती डिआरडीओचे शास्त्रज्ञ यांनी पदाचा गैरवापर करत त्यांचे ताब्यात असलेले संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!