धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात; पुणे जिल्ह्यातील सोपतरवाडी परिसरात घटना

162 0

पुण्यातील अपघाताचे सत्र सुरुच आहेत. अशातच आता पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण धडक झाली. राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

सुदैवाने गाडी पलटी न झाल्याने राजश्री मुंडे व चालक सुखरुप आहेत. त्यानंतर मुंडे या खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आहेत. या अपघातात त्या सुखरूप असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!