मुंबई : देवेन भारती (DEVEN BHARATI)यांची बुधवारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी भारती यांची वर्णी लागली आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त असलेले देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी देवेन भारती यांच्यासह सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलिस अधिकारी अर्चना त्यागी यांचीही नावे चर्चेत होती.
देवेन भारती हे मूळचे बिहारच्या दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंड येथून मॅट्रिक केली. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन-९ व डीसीबी गुन्हे शाखा म्हणूनही काम केले आहे. त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा व त्यानंतर सहपोलिस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) पदावरही काम केले आहे. ते पोलिस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था) व महाराष्ट्र एटीएसचेही प्रमुख होते.
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचं सहव्यवस्थापकीय संचालक पद त्यांनी भूषवलं आहे. देवेन भारती यांचा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहभाग होता.
त्याचबरोबर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014-2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली.
मात्र 2019 नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची नियुक्ती जाणून-बुजून तुलनेने कमी महत्त्वाच्या पदांवर करण्यात आल्याची चर्चा झाली.
त्यावेळी त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळासारख्या विभागांमध्ये काम करावं लागलं. मात्र, पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्यासाठी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केलं.
पोलीस दलाच्या इतिहासात 2023 मध्ये पहिल्यांदाच हे विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आलं होतं. ज्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबईतील सर्व सह पोलिस आयुक्त हे देवेन भारती यांना अहवाल द्यायचे.
त्यानंतर देवेन भारती ते अहवाल थेट आयुक्तांना द्यायचे. त्यामुळे ज्या देवेन भारतींसाठी एक नवं पद तयार केलं जाऊ शकतं, त्यांचीच आयुक्तपदी नियुक्ती होईल अशी चर्चा रंगली होती. आणि तसंच घडलंही..
वाढती गुन्हेगारी, दहशतवादाचा सावट, राजकीय घडामोडींचा केंद्रस्थान असलेल्या मुंबईवर जरब बसवण्याची मोठी जबाबदारी नवनियुक्त आयुक्त देवेन भारती यांच्यावर असणार आहे. अर्थात मुंबईत यापूर्वी देखील अनेक वर्ष काम केल्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात मुंबईचा कार्यभार उत्तम रीतीने सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
DAUND POLICE CASE: दौंडमध्ये चोरट्यांनी पोलिसांचीच केली चोरी मोबाईल, रोख रक्कम घेऊन पसार