उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पूरपरिस्थिती व मदतकार्याचा घेतला आढावा

591 0

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि. २६ जुलै रोजी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंदवार,पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी श्री.सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पुणे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. यावेळी बोलताना डॉ.गोऱ्हे यांनी ही निसर्गिक आपत्ती असली तरी त्याची तीव्रता कॉंक्रेटीकरणामुळे वाढली आहे.त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या. त्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अश्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

तसेच ज्या नागरिकांचे महत्वाचे कागदपत्र पावसाच्या पाण्याने खराब झाले आहेत. त्यांना तात्काळ लागणारी महत्वाची कागदपत्रे प्रशासनाने या नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत. पूरपरिस्थितीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले.

एनजीओ किंवा सामाजिक संस्था नागरिकांना जी मदत करत आहे त्यामध्ये समन्वय करण्यासाठी महानगरपालिकेने वॉर्ड ऑफिसरच्या स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करावा.तसेच विद्युत पुरवठा खंडित केल्यावर नागरिकांना कळविले जात नाही.त्यामुळे नागरिकांना कमी त्रास व्हावा या हेतूेने, नागरिकांना त्यांच्या मोबाईल वरती मेसेजेस पाठवणारी यंत्रणा कार्यान्वित करावी.असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले.

पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!