मोठी बातमी ! दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच ! दाऊदच्या भाच्यानेच केला खुलासा

457 0

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे उघड झाले आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने ईडीसमोर आपला जबाब दिला.

अलीशाह पारकरने ईडीसमोर दिलेल्या जबाबत सांगितले की, दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये असून त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते. दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे.

दाऊदने भारत सोडला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नाही. कधीकधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझे मामा दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात, असंही अलीशाहनं सांगितलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!