AJIT PAWAR VIRAL VIDEO: सोलापुरातील करमळ्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अंजली कृष्णा यांना एक कॉल आला पलीकडून सांगण्यात आलं
की मी उपमुख्यमंत्री बोलतोय त्यावर विश्वास बसला नाही म्हणून चक्क पवारांनी व्हिडीओ कॉल केला.
हा vedio सोशल मीडियावर चांगलाच व्हायराल झाला त्यानंतर आता
अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय.
बेकायदा मुरूम उपशाला पाठबळ ? त्या व्हिडीओ कॉलवरुन शेतकरी संघटना आक्रमक
शिवाय बेकायदा मुरूम उपशाला अजितदादांचे पाठबळ आहे का?
असा आरोप होतोय त्यामुळे एकूणच हे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येते की काय? अशी स्थिती आता निर्माण झालीये
माढा तालुक्यातील कुर्डू या गावात बेकायदेशीर मुरमाच्या गाड्या चालवल्या जातात.
बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू असताना उपमुख्यमंत्री अशोक पवार हे तेथील डीवायएसपींना फोन करून सोडून द्यायला सांगतात, माझा आदेश आहे म्हणतात म्हणजेच अजित दादा दादागिरी करत आहेत. एकीकडे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणतात.
आणि दुसरीकडे एका महिला अधिकाऱ्यासोबत दमदाटी करतात असं म्हणत अजित पवारांनी फोनवरून केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झालीये. अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुर्डू गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळवून लावलं गावातील दोन तलाठ्यांना मारहाण केली. गावात तब्बल तीन तास हा सगळा प्रकार सुरू होता चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अशोक पवारांचा दबाव टाकला जातो पण कुठलीसुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी तातडीने महिलेची माफी मागून राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरली
आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना संबंधितांनी धमकवण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी
अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांनी केलीये.
एवढाच नाही तर पुढच्या आठ दिवसात कारवाई झाली नाही
तर हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय.
Bhor News: भोर – शिरवळकरांची तारेवरची कसरत; रस्त्याचे काम खोळंबल्याने तासंतास वाहतूककोंडी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वचक ठेवणारे म्हणून परिचित आहेत.
चुका झाल्या तर तोंडावर बोलणारे आणि थेट निर्णय घेणारे म्हणून प्रचलीत आहेत. असं असतांना सोशल मीडियावर व्हायराल झालेल्या व्हिडीओवरून पावरांच्या भूमिकेवर नाराजीचा सुर उमटताना दिसतोय.आता नेमकं या प्रकरणात पुढे काय होतं की हे प्रकरण सोशल मीडियावर फक्त चर्चेपुरतं उरतं? हे पहावं लागेल