neelam-gorhe

परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावे… डॉ.नीलम गोर्हे

578 0

परभणी : परभणी येथे दिनांक ३ जानेवारी च्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात त्यांनी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व याघटनेत आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल याबाबत सूचना केल्या. यात परभणीत अशाच प्रकारे गुन्हा घडल्याचे व यातील कार्यपद्धती एकाच असल्याचे देखील डॉ.गोर्हे यांनी परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

यात सूचना करताना डॉ.गोर्हे यांनी सांगितले की, यात
* साक्षीदार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत पीडित कुटुंबाला संरक्षण दिले जावे व पीडित कुटुंबाला सामाजिक दृष्टिकोनातून त्रास होत असले तर त्यांना निकाल लागे पर्यंत दुसऱ्या ठिकाणी निवासाची व उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.
* ⁠आरोपीला तत्काळ अटक करावी.
* पीडित महिला व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे व पीडित महिलेला कौटुंबिक त्रास होणार नाही यासाठी खास लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
* ⁠मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा व त्याला तत्काळ मान्यता कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करावा.
* ⁠याघटनेत विशेष सरकार वकील नेमत असताना पूर्वी ज्या वकिलांनी दोषसिद्धी मिळाली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे.
* ⁠महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करून घेण्यात यावी अशी सूचना डॉ.गोर्हे यांनी यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांना केल्या यास श्री परदेशी यांनी स्वीकार केला असून तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

Share This News
error: Content is protected !!