नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने 288 पैकी 135 जागा लढण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे ठेवल्यानं जागावाटपावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 17 जागा लढवल्या आणि 13 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष काँग्रेस आहे आणि याच मूळ महाविकासआघाडीत काँग्रेसकडून जास्तीत जास्त म्हणजे तब्बल 135 जागांची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसला सर्व म्हणजे 288 मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते त्या अनुषंगाने काँग्रेसने आता 135 जागांची मागणी केल्याचे बोलला जात आहे. जर काँग्रेसने 135 जागा लढवल्या तर उर्वरित 153 जागांपैकी किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला जाणार आणि किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष लढवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे…
दरम्यान काँग्रेसच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा जागावाटप कसं होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे.