ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली उमेदवारी?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या अगोदर 48 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली होती.

जालनातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना पुन्हा संधी देण्यात आले असून सावनेर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

  1. भुसावळ राजेश मानवतकर
  2. जळगाव जामोद स्वाती वाटेकर
  3. वर्धा शेखर शेंडे
  4. सावनेर अनुजा केदार
  5. नागपूर दक्षिण गिरीश पांडव
  6. कामठी सुरेश भोयर
  7. भंडारा पूजा ठावकर
  8. अर्जुनी मोरगाव सुरेश बनसोड
  9. आमगाव राजकुमार पुरम
  10. राळेगाव वसंत पुरके
  11. आर्णी जितेंद्र मोघे
  12. जालना कैलास गोरंट्याल
  13. उमरखेड साहेबराव कांबळे
  14. यवतमाळ अनिल मंगोलकर
  15. छत्रपती संभाजी नगर पूर्व मधुकर देशमुख
  16. वसई विजय पाटील
  17. कांदिवली पूर्व काळू पडलीया
  18. चारकोप यशवंत सी
  19. सायन गणेश यादव
  20. श्रीरामपूर हेमंत ओघळे
  21. निलंगा अभयकुमार साळुंखे
  22. शिरोळ गणपतराव पाटील
  23. अकोट महेश गांगणे