सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू

341 0

किल्ले सिंहगडावर अचानक कोसळलेल्या दरडीत अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी सकाळी दाट धुके असताना 9च्या सुमारास ही घटना घडली. बराच वेळ झाला तरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर हेमंत यांच्या घरच्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर गडावर शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा ही बाब सामोर आली. सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील पायवाटेवर ही दरड कोसळली. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसाही याठिकाणी धुके असते. त्यात ही दुर्घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!