आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट; परीसरात तणावाचं वातावरण

509 0

टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. यामुळे संपूर्ण आळंदी गजबजली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.

Share This News
error: Content is protected !!