‘मुख्यमंत्री राज ठाकरे’; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

194 0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुण्याच्या करसवलतीसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

या भेटीनंतर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचं कॅप्शन लक्ष वेधणारं आहे. पुण्याच्या प्रश्नासाठी राज ठाकरे थेट पोहोचले ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण आलं समोर या फोटोमध्ये राज ठाकरे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, तिथे त्यांच्या पाठीमागेच मुख्यमंत्री असं लिहिलेली पाटी आहे. हाच फोटो ट्विट करत मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की ‘मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणून पाहायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल’.

Share This News
error: Content is protected !!