चौंडी राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर १५० कोटींची उधळपट्टी ; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

303 0

मुंबई : जनतेला आर्थिक अडचणीत टाकून राज्यसरकार पंचतारांकित सुविधा भोगत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

अहिल्यानगरच्या चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंडप व्यवस्थेवर तब्बल १५० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याबद्दल सपकाळ यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारला जाब विचारला आहे. हे सरकार जनतेला आर्थिक अडचणीत टाकून स्वतः पंचतारांकित सुविधा भोगत असल्याचे सपकाळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते म्हणाले की, राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून सरकारने ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये दिले नाहीत. शेतकरी कर्जमाफी केली नाही. जनतेला अडचणीत टाकून सरकार पंचतारांकित सुविधा भोगत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!