MADHAV GADGIL: माधव गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार

280 0

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फेप्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ (MADHAV GADGIL)यांना जाहीर झाला आहे.

पश्‍चिम घाटातील पर्यावरणावर वाढत्या लोकसंख्येचा, हवामान बदलाचा आणि पर्यावरणाच्या (Environmental) दृष्टीने अत्यंत संवेदनशील  असलेल्या या भागातील विकासकामांचा (development works) होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सरकारच्या (Government) वतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद गाडगीळ यांनी भूषविले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गाडगीळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.

डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत 7 पुस्तके लिहिली असून, 225 वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

एक होतं वायनाड’: निसर्ग कोपला! केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू तर चार गावं गेली वाहून

Share This News
error: Content is protected !!