Breaking News ! राणा दांपत्य अजून दोन दिवस कोठडीतच, जामिनावर बुधवारी निर्णय

403 0

मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर निकाल देताना राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवारपर्यंत (4 मे पर्यंत) वाढ केली आहे. 

शनिवारी या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे.

नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

Share This News

Related Post

छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पुण्यात पडसाद ; भुजबळांनी माफी मागावी , भाजपची मागणी

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा ?…
Pankaja Munde

Pankaja Munde : “आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू”, पंकजा मुंडेंचा नेमका रोख कोणावर?

Posted by - October 24, 2023 0
बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज भगवान गडावरून जाहीर सभा घेतली. या सभेला हजारोंच्या संख्येने लोक…

युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी सुखरूप परतले

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना…

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार

Posted by - June 9, 2022 0
राष्ट्रपती पदासाठी ची निवडणूक आज जाहीर होणार असून आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे. राज्यसभा…
loksabha

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *