गोळीबार आणि खुनाच्या घटनेने आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहर हादरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर येथील परशुराम चौकात विशाल गायकवाड ह्यात तरुणावर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केला आहे. गोळीबाराच्या घटनेते विशाल गायकवाड ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झाले असून, जुन्या वैमानस्यातून विशाल गायकवाड याचा प्रतिस्पर्धी टोळीतील आरोपींनी खून केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            