पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून अखेर वाल्मीक कराड CID ला शरण आला आहे.शरण येण्यापूर्वी त्याने स्वतःची चित्रफीत जाहीर केली असून त्यात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
पुण्यातील पाषाण रस्त्यावरील CID च्या कार्यालयात आज दुपारी 12:15 वाजता वाल्मीक कराड शरण आला असून त्याची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली त्यानंतर वाल्मीक कराडला केज या ठिकाणी नेण्यात आलं आहे.
कोण आहे वाल्मीक कराड
अवादा पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून बुधवारी केज पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड यांनी फोन करून ‘आहे त्या स्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.
अशी धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यावरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे वाल्मीक कराड,राष्ट्रवादीचे केजचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे,सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय समजले जातात. परळीत वाल्मीक कराड यांची दहशत आहे धनंजय मुंडेंचं काहीच चालत नाही असं विधान काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.
खरं तर परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी शरद पवार यांनी बबन गीते या वंजारी चेहऱ्याला शरद पवार गटात घेतल. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी आलेला गाड्यांचा ताफा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी झालेली सभा बबन गीते यांनी गाजवली होती.
लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सहभाग घेतला. परळीत बूथ कॅपर झाल्याचे आरोप त्यांनी दिले आणि पुरावे देखील प्रसिद्ध झाले. पंकजा मुंडेंचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभवासाठी बबन गीते यांनी मेहनत घेतल्याचं बोललं जातं. परंतु आता परिस्थिती बदलली असून पण गीते यांच्यावर खुनाचा आरोप आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे अमित शहा अशी वाल्मिक कराड यांची ओळख आहे.
परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पांगरी गावात 29 जानेवारी 1969 मध्ये वाल्मीक कराड यांचा जन्म झाला. वडील आणि दुसरे लग्न केल्यामुळे ते मामांकडे राहायला आले. आईने रोजगार हमी योजनेच्या कामाला जाऊन त्यांचा सांभाळ केला. त्यांना सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचा आकर्षण असल्यास बोललं जातं. कराड भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या आधीपासूनच ते सायकलला कमळाचा झेंडा लावून फिरायचे असं सांगितल्या जातं. 2001 मध्ये वाल्मीक कराड हे नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते. 2009 ला धनंजय मुंडे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आलं. तेव्हापासून धनंजय मुंडे नाराज होते.
तिकीट नाकारल्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात अंतर वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत एक वेगळे होण्याचा निर्णय काही नेत्यांनी घेतला आणि त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे वाल्मीक कराड.
काही महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी एक विधान केलं होतं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. परळीत वाल्मीक कराड यांची मोठी दहशत आहे त्यामुळे तेथे त्यांचं चालतं. धनंजय मुंडे जरी आमदार असले तरी परळीत फक्त वाल्मीक कराड यांचं चालतं. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, जमिनी हडपल्या जातात. असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. परळीमध्ये वाल्मीक कराड हे अण्णा या नावाने परिचित आहेत.
SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ‘तो’ व्हिडीओ सीआयडीच्या हाती