विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झाला असून भाजपाचे पाचवे उमेदवार माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजय झाला आहे.
सदाभाऊ खोत यांना दुसऱ्यांदा भाजपा कडून संधी मिळाली असून यावेळी महादेव जानकर यांचा पत्ता कट करत सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे.