भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंच्या पत्नी उषा काकडे यांच्या अडचणीत वाढ

1005 0

पुणे : मेव्हण्याची बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे  माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा संजय काकडे यांचे विरुद्ध चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम ५००, ५०४, ५०६(२), ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांचे विरुद्ध दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचं नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

संजय काकडे यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले (वय, ४०) यांनी याबाबत काकडे यांच्याविरूध्द फिर्याद दिली होती. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक देखील झाली होती न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
काकडे दाम्पत्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर  सदर प्रकरणात उषा काकडे यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचा अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानंतर उषा काकडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, फिर्यादी यांस नोटीस न बजावता व त्यांस त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता सत्र न्यायालयाने काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता या , सदर आदेशाच्याविरुद्ध फिर्यादी युवराज थमले यांनी उच्च न्यायालयात त्यांचे वकिलांमार्फत धाव घेतली होती. या प्रकरणी मा उच्च न्यायालयानं प्रकरणाची दखल घेत उषा काकडे यांचा नाव वगळण्याचा निर्णयास स्थगित करून उषा काकडे यांस नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले आहेत.

या प्रकरणात फिर्याद ढमाले यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आबाद कोंडा, ॲड. सत्यव्रत जोशी, ऍड. निलेश त्रिभुवन व ॲड. विजयसिंह ठोंबरे ॲड विशाल काळे यांनी कामकाज पाहिलं

Share This News
error: Content is protected !!