मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का; ठाकरेंच्या शिलेदारांनं मारलं मैदान

1169 0

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटानं यांनी बाजी मारली असून भाजपाला या मतदारसंघात मोठा धक्का बसलाय…

मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाच्या किरण रवींद्र शेलार यांच्यामध्ये प्रमुख लढत होती.

या लढतीत अनिल परब यांनी बाजी मारली असून भाजपाला पराभवाचा सामना सहन करावा लागला.. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अनिल परब यांना या निवडणुकीत 44,791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. अनिल परब 26 हजार 20 मतांनी विजयी झाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!