शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुक आयोगाचा दिलासा; तुतारी चिन्हाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकी वेळी तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या दोन चिन्हांमुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला होता.
या अनुषंगाने आता राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून ईव्हीएम मशीन वर ट्रंपेट असणाऱ्या चिन्हाचा मराठी भाषांतर तुतारी रद्द करून ट्रंपेट असंच करण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केलेली ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने मान्य केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मानला जातोय.
ईव्हीएम मशीन वर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस अस चिन्ह असणार आहे
