मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटवलं

301 0

मुंबई: गेल्या दहा दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर अखेर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय नाट्यावर पडदा पडला होता 

मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे या माध्यमातून आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अजून विकोपाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडून 39 आमदारांना आपल्या सोबत घेतले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

 

दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी करण्यात येईल असे मानले जात होते आतापर्यंत तरी तसे करण्यात आले नाही तथापि आज रात्री शिवसेनेतर्फे अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नेते पदावरून हटवण्यात आलेले आहे

Share This News
error: Content is protected !!