शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

577 0

मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून यामुळं शिवसेना वर्धापन दिनाअगोदरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात मनासारखं काम करता येत नसल्यानं पदाचा राजीनामा देत असल्याचं शिशिर शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

१९ जून २०१८ रोजी शिशिर शिंदे यांची मनसेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती. त्यानंतर त्यांना ४ वर्ष शिवसेना पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेतेपदी शिशिर शिंदे यांची वर्णी लागली होती.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींदरम्यान शिशिर शिंदे यांना उपनेतेपद देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

Share This News
error: Content is protected !!