विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी व कृपाल तुमाने या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या पाच टर्म खासदार होत्या तर कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभेचे खासदार होते मात्र यंदाच्या 2024 निवडणुकीमध्ये या दोघांचाही तिकीट कापण्यात आलं होतं त्यानंतर आता भावना गवळी आणि कृपाल तुमने यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.