EKNATH SHINDE : एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली! महायुतीच्या दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहणार ?

EKNATH SHINDE : एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली! महायुतीच्या दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहणार ?

167 0

एकनाथ शिंदे अचानक गावी गेल्याने महायुतीच्या बैठका रद्द करण्यात आल्या. अस्वस्थ असलेले एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावातून ठाण्याला परतले. त्याच बैठका आता पार पडतील अशी शक्यता असताना एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या बैठका आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना 105 डिग्री ताप होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच आता पुन्हा प्रकृती बिघडली आहे. सोमवारी डॉक्टरांनी तपासल्यानंतर ही बाब समोर आली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महायुतीच्या बैठकीला गैरहजर राहणार ?

एकनाथ शिंदे यांच्या आजारपणामुळे भाजपने दिल्लीत बोलवलेल्या बैठकीला ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीतील बैठकीसाठी आज दुपारी रवाना होणार आहेत. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे शिंदे या बैठकीला जाणं टाळू शकतात.

मागच्या बैठकीनंतर शिंदे अस्वस्थ

मागच्या वेळी भाजपने बोलावलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते. अमित शहा (Amit Shah) यांनी घेतलेल्या या बैठकीनंतर एकनाथ शिंदे थेट गावी निघून गेले. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यामुळे आज बोललेल्या बैठकीला देखील ते अनुपस्थित राहू शकतात.

Share This News
error: Content is protected !!