Breaking News

ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुम्हालाही बसू शकतो आर्थिक भुर्दंड

1257 0

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे आणि या ऑनलाइनच्या काळात तरुणाईची पाऊल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमिंगकडे वळत चालली आहे. सध्या मुलं ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून आर्थिक नुकसान करुन घेत असतात.आता असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात एका तरुणासोबत घडलंय

ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाने तब्बल ४० लाख रुपये गमावल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे असं या तरुणाचं नाव असून ऑनलाइन गेमच्या वेडापायी त्याला शेत जमीनही विकावी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून परमेश्वरला मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची तलफ लागली. ऑनलाइन गेम खेळत असताना सुरुवातीला १००, ५०० आणि हजार रुपयांनी हा गेम खेळायला सुरुवात केली. खेळात नवीन असल्याने सुरुवातीला त्याला पैसेही मिळू लागले. घरी आरामात बसून मोबाईलवर पैसे मिळू लागल्याने. मग त्यांने खेळात १००, २००, ५०० रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. पण हळूहळू हे पैसे सगळे डुबत गेले. हजार पाच हजारांचा आकडा कधी लाखांच्या पार गेला हे त्यालाही कळलं नाही.जवळचा पैसा संपला तसे त्याने उसने पैसे घेण्यास सुरुवात केली. शेवटी हतबल झालेल्या परमेश्वरने आपली कार आणि शेत जमीनही विकली. .

मॉस्ट बेट हा गेम एका परदेशी कंपनीनं तयार केला आहे. त्याला भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नसून तो खेळणाऱ्याला लिंकद्वारे डाऊनलोड करावा लागतो. .झटपट पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेमच्या नादात

Share This News
error: Content is protected !!