मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं नियोजन कसं असणार, वाचा सविस्तर

सभास्थळ सजलं, VVIP ठरले, हजारोंचा बंदोबस्त लागला; मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं नियोजन कसं असणार, वाचा सविस्तर

159 0

राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून या सोहळ्याचं नियोजन नेमकं कसं असेल, याची माहिती समोर आली आहे.

5 डिसेंबरला मुंबईत महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर भाजपकडून आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या शपथविधीसाठी जवळपास 40 हजार जणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

शपथविधीसाठी तीन स्टेज

शपथविधीसाठी तीन मोठे स्टेज उभारण्यात येत आहेत. एक मुख्य स्टेज आणि बाजूला छोट्या स्टेजची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी मुख्य मंचावर शपथविधीचा कार्यक्रम होईल. सर्व मुख्य मान्यवर याच स्टेजवर बसतील. तर दुसऱ्या मंचावर अनेक धार्मिक साधू महंतांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तर तिसऱ्या मंचावर संगीत सोहळा होणार आहे.

VVIP आसन व्यवस्था

या शपथविधीसाठी जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी VVIP पास असणार आहेत. तसेच त्यांच्यासाठी 13 विशेष ब्लॉक असणार आहेत. यामध्ये या मान्यवरांची आसन व्यवस्था असणार आहेत. यामध्ये मंत्री, आमदार, खासदार आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर असणार आहेत.

सोहळ्याचं नियोजन

• शपथविधीसाठी एकूण 3 स्टेज
• मुख्य स्टेज 60× 100 फुट
• उजव्या आणि डाव्या बाजुला 60× 50 चे दोन स्टेज
• उजव्या बाजुच्या स्टेजवर संत- महंत, व्हीआयपी
• डाव्या बाजुच्या स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
• स्टेजसमोरच्या आमदार-खासदार, निमंत्रीत, व्हीआयपी आसनव्यवस्था
• सर्वसामान्यांसाठी 3 प्रवेशद्वारे आणि 30 ते 40 हजार आसनव्यवस्था
• काही लाडक्या बहिणींना निमंत्रण
• हजारो पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!