विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांचा हुबळी येथे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे.
हुबळी येथे आज दुपारी ही घटना घडली आहे.
अंगडी चंद्रशेखर गुरुजी नावाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ओळखले जात. हॉटेलमधल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. बळीच्या एका हॉटेलमध्ये जाऊन तिथे बसताना दिसत आहेत. त्या हॉटेलमध्येच ते थांबले होते.
वास्तू तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपलं करियर सुरू केलं होतं. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी वास्तूचे काम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या दोन व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.