Unseasonal Rain

PUNE RED ALART रेड अलर्ट देताच पुण्यात पावसाची दांडी, चटके बसण्यासारखे ऊन… हवामान विभागाचा अंदाज चुकला ?

416 0

PUNE RED ALART गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. मात्र आज दिवसभरात पुणे शहरात ऊन पडल्यामुळे पुणेकर हवामान विभागावर ताशेरे ओढताना दिसून येत आहेत. मात्र हवामान विभागातर्फे देण्यात आलेला अलर्ट हा पुणे शहरा साठी नसून पुण्यातील घाट विभागामध्ये दिलेला होता, असे स्पष्टीकरण हवामानतज्ज्ञांनी दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाला असल्याने पुण्यातील विविध घाटमाथ्यांवर आणि कोकण विभागात प्रचंड पाऊस होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. या रेड अलर्ट ला गांभीर्याने घेत पुणे शहर आणि ग्रामीण विभागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र असे असतानाही आज पुणे शहरात चक्क निरभ्र आकाश आणि कडक ऊन पडलेले दिसून आले. काही ठिकाणी ढग दाटून आले होते, तुरळक सरी बरसल्या. मात्र गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या पावसाच्या मानाने आज पुण्यात काहीच पाऊस झाला नाही. त्यामुळेच हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला, असे म्हणले जात आहे. मात्र हा रेड अलर्ट केवळ घाट विभागासाठी होता पुणे शहरासाठी नाही, असे स्पष्टीकरण हवामान तज्ञांनी दिले आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहरात रेड अलर्ट देण्यासारखा पाऊस होणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!